

सामान्य माणूस केंद्रचिंदू मानून काम केले असून मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये खेचून आणले आहेत, जनता आपल्याबरोबर असल्याचे समजून प्रतिस्पर्धी उमेदवार कोण याची चिंता न करता मॅट्ट्रिक साधण्यासाठी सज्ज झाल्याचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर सांगत आहेत.
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणण्यासाठी सर्पनाला, धामणी, नागणवाडी प्रकल्पाबरोच अनेक प्रकल्प मार्गी लावले असून पाणीदार मतदारसंघासाठी प्रयत्न केले. यामुळे हजारो एकर शेतीत सिस्वं सोनं पिकण्यास मदत होणार आहे.
खेडी बांगल्या रस्त्यांनी जोडली जावीत यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. दाजीपूर अभयारण्य, किल्ले भुदरगड, रांगणा व वर्षा पर्यटनासाठी येणान्या पर्यटकांसाठी पर्यटन हब बनविला. या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
स्वातंत्र्यापासून आजतागायत, एस.टी. सेवेपासून वंचित राहिलेल्या गावांना मुख्य प्रवाहात आणले. आजरा, राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील प्रशासकीय इमारती प्रशस्त बनवून वैभवात भर टाकली. विकासकामात कोणतेही राजकारण न आणता प्रत्येक बाडी वस्तीपर्यंत विकासकामांच्या विविध योजना राबविल्या.
लोकहितकारी निर्णय घेतले. पोलिस पाटील मानधन, आरोग्यसेविका मानधन, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, मराठा आरक्षण सारख्या समाजाभिमुख प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून प्रश्न मार्गी लावले. या जोरावर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू आहे. महामूर्तीकडून आमदार प्रकाश आबिटकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे विधानसभा मिशन २०२४ फत्ते करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असा विशवास कार्यकल्पात आहे.
गारगोटी: रविराज बि. पाटील महिन्यापूर्वी गारगोटीत के. पी. पाटील यांनी जाहीर सभा घेऊन निवडणूक लढविणारच, असा आक्रमक पवित्रा घेऊन विधानसभेचे रणशिंग फुंकले. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणामुळे ते कोणता झेंडा हाती घेणार, याकडे लक्ष लागले आहे. तथापि, लढाई नक्की, मात्र संभ्रमात के. पी. असे चित्र दिसत आहे.
मतदारसंघात के. पी. पाटील यांचा गट प्रबळ आहे. दोन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. बिद्री कारखान्याच्या कारभारामुळे सभासदांत त्यांची चांगली प्रतिमा आहे. बिद्री कारखान्यातील निवडणुकीत सवघवीत यश मिळवल्यामुळे केपींसह कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बिद्री कारखान्यावर केलेल्या कारवाईनंतर मोर्चे काढून विधानसभेसाठी मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.
गारगोटी येथील सभेत तर विधानसभेचे रणशिंग फुंकल्याचे सांगत कार्यकत्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे मुदालतिद्वयाच्या वेशीवर भव्य कमान बांधून जंगी स्वागत केले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यात भेट घेऊन महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले. मात्र, या दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केपींना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.
के. पी. यांनी गावोगावी कार्यकत्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. महायुतीकडून विद्यमान आमदारांना संधी मिळणार असल्याने के. पी. पाटील यांना महाविकास आघाडीशिवाय पर्याय उरलेला नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी कोणत्या घटक पक्षाला जाणार याची खात्री नाही. त्यामुळे के. पी. पाटील यांच्यासमोर निर्णय देण्याचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ते कोणता झेंडा हाती घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राशिवडे: प्रवीण ढोणे थेट जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून राजकारणामध्ये एंट्री केलेल्या ए. वाय. पाटील यांची राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आमदार माणून निवडून जाण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यापद्धतीने गेली दहा वर्षे डाऊंड पातळीवर तयारीही सुरू आहे, तरी आता पुन्हा त्यांना उमेदवारीसाठी झगडावे लागणार आहे.
ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील हे सख्खे मेहुणे-पाहुणे. पण या दोघांचे राजकीय वैराय जिल्ला पाहतो आहे. आमदारकीसाठी दोषांच्या नात्यांमध्ये दुरावा आला. दहा वर्षांपासून ए, बाय. जिल्हा बँक, जि.प., पं. स.च्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. गावोगावी त्यांचे स्वतंत्र गटही कार्यरत आहेत.
सध्या त्यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी ते लोकसभा निवडणुकीपासूनच महाविकास आघाडीसोबत आहेत. भोगावती कारखान्याच्या सत्तेतही दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या गटासोबत त्यांचा सत्तेचा बाटा आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी ते आग्रही आहेत. आता नाही तर कधीच नाही, या भावनेतून त्यांनी राजकीय पेरणी केली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत.
गावोगावी त्यांनी संपर्कही सुरू केले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर विसंबून असणाऱ्या ए, वाम यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लदविण्याची तयारी केली आहे. त्यांनी मित्रपक्षांशी चांगले संबंध ठेवले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेत त्यांनी कब्रिसच्या शाहू महाराजांच्या प्रचारात उतरून मतदारसंघ सवजून काढला. त्यांच्या उमेदवारीची मदार कग्रेिसचे जिल्याध्यक्ष आमदार सतेज पाटील व दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील- सडोलीकर यांच्यावरच अवलंबून आहे, हे नक्की.