पुढारी ऑनलाईन डेस्कः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन आर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज (दि.२३ ऑगस्ट) सुनावणी झाली. दरम्यान न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणी पुढे ५ सप्टेंबरला ढकलली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली उच्च उच्च न्यायालयाने त्यांची अटक कायम ठेवली. त्यानंतर केजरीवाल यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी झाली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सीवीआयला एका याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी आणखी एका आठवड्याची मुदत दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणी ५ सप्टेंबरला ठेवली आहे.
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने केलेल्या केजरीवाल यांच्या अटकेला जामीन मिळावा या याचिकेवर यापूर्वी बुधवारी (दि.१४ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केजरीवाल यांनी केंद्रीय एजन्सीद्वारे केलेल्या अटकेला आव्हान देणारी स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने 'सध्या तरी अंतरिम जामीन नाही' असे स्पष्ट करत सीबीआयला शुक्रवार २३ ऑगस्टपर्यंत 'उत्तर द्या' नोटीस जारी केली आहे. यावर आज पुन्हा सुनावणी झाली, यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला पुन्हा एकदा उत्तर दाखल करण्यासाठी एक आठवड्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.