Gokul Politics: सतेज पाटलांच्या बहुमताला धक्का? ४ शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी; नाविद, शौमिका यांची नावे चर्चेत

मंत्रिमंडळ बैठकीत गोकुळमध्ये चार शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. यामुळे सतेज पाटलांच्या बहुमताला धक्का बसला आहे.
Gokul Politics
Gokul PoliticsFile Photo
Published on: 
Updated on: 

Maharashtra Cabinet approves 4 nominated directors

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाच्या निवडीचे प्रकरण न्यायालयात गेले असताना, राज्य सरकारने 'गोकुळ'मध्ये तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करून आणि त्यांना मतांचा अधिकार देऊन अध्यक्षपद मिळविण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आज बुधवारी (दि. ४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गोकुळवर चार शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. यामुळे सतेज पाटलांच्या बहुमताला धक्का बसला आहे.

'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदावरून सध्या प्रचंड राजकीय घडामोडी सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ला २५ पैकी १३ जागा मिळाल्या आहेत, तर विरोधी महायुती आघाडीला १२ जागा मिळाल्या आहेत. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आयोजित सभेला महायुती आघाडीचा एकही संचालक हजर राहिला नाही. त्यामुळे कोरमअभावी अध्यक्ष निवड वादात सापडली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची समांतर सभेत अध्यक्षपदी निवड केली. आता हे प्रकरण कोल्हापूर सर्किट बेंचपुढे गेले आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही सत्ताधारी महायुतीने 'गोकुळ' ताब्यात घेण्याची खेळी रचली आहे.

Gokul Politics
Hasan Mushrif : गोकुळमध्ये राजकीय पायतान बाहेर ठेवू, पुढच्या बैठकीला महायुतीचे संचालक हजर असतील; मुश्रीफांचे मोठे संकेत

४ शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकारही मिळणार

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'गोकुळ'मध्ये शासननियुक्त सदस्य नेमण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. 'गोकुळ'वर शासननियुक्त ८ सदस्य नेमण्याची मागणी पत्रात केली होती. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गोकुळवर ४ शासननियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. या संचालकांना मतदानाचा अधिकारही मिळणार आहे.

नविद मुश्रीफ, शौमिका महाडिक यांच्यासह 'ही' नावे चर्चेत

शासननियुक्त संचालक म्हणून महायुतीकडून शौमिका महाडिक, हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ, ए. वाय. पाटील किंवा बाळासाहेब खाडे, अशोक फराकटे, यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. तर यड्रावकर यांच्या गटाकडून अमरसिंह पाटील यांना संचालक करण्याची मागणी आहे.

Gokul Politics
Gokul Dairy | ‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना ११७ कोटींची दिवाळी भेट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.