Hasan Mushrif : गोकुळमध्ये राजकीय पायतान बाहेर ठेवू, पुढच्या बैठकीला महायुतीचे संचालक हजर असतील; मुश्रीफांचे मोठे संकेत

Hasan Mushrif Vs Satej Patil :आम्ही छोटी माणसं... बहुमत तुम्हाला मिळालयं, कोरमची जबाबदारी तुमचीच; मुश्रीफांनी चेंडू सतेज पाटलांच्या कोर्टात ढकलला
Hasan Mushrif Vs Satej Patil
Hasan Mushrif Vs Satej Patilpudhari
Published on: 
Updated on: 

Hasan Mushrif Vs Satej Patil: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी गोकुळचे नवे अध्यक्ष म्हणून शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड करून एक मोठी खेळी केली. त्यानंतर आता उच्च न्यायालयात जात ही निवड कशी कायदेशीर आहे याबाबतची कायदेशीर लढाई देखील सुरू केली.

त्यामुळं आगामी काळात कोल्हापुरात गोकुळवरून महायुती आणि समविचारी अशी लढाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच आता महायुतीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत कोरम पूर्ण करायची जबाबदारी सतेज पाटील यांचीच असल्याचं सांगितलं.

Hasan Mushrif Vs Satej Patil
Gokul Chairman | समांतर सभेत ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी शशिकांत चुयेकर

मीच शशिकांत पाटील चुयेकरांचे नाव सुचवले

हसन मुश्रीफ पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'मी काल बोलून मन मोकळं केलं आहे. अरूण डोंगळे राजीनामा देण्यासाठी टाळाटाळ करत होते. तेव्हा मी आणि बंटी पाटील यांनी एकत्र बसून अध्यक्ष कोणाला करायचं याची चर्चा केली होती. त्यावेळी सतेज पाटील यांनी बाबासाहेब चौगुले यांचे नाव सुचवलं. तर मी शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव सुचवलं होतं. कराण त्यांच्या गुरूंचा मुलगा असल्याने डोंगळे राजीनामा देतील असा आमचा अंदाज होता.

मुश्रीफ पुढे म्हणाले, 'अरूण डोंगळेंनी महायुतीचा चेअरमन होत असेल आणि एकनाथ शिंदेंनी सांगितलं तर मी राजीनामा देतो एसं सांगितलं. त्यामुळं हा विषय राज्यस्तरावर गेला. त्यामुळे पाकिटातून नाव देणं हा भाग नाही. मुख्यमंत्र्यांसमोरच हे ठरलं होतं.'

Hasan Mushrif Vs Satej Patil
Satej Patil | अध्‍यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांच्या नावाचे पाकीट दिले, तेव्हा मी जातीयवादी नव्हतो का?

सतेज पाटलांना टोला

यानंतर हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना टोमणा मारत, 'बहुमत तुम्हाला मिळालं आहे. मग आमच्याकडून अपेक्षा का करता, कोरम पूर्ण करण्याची आणि चेअरमन निवड करण्याची जबाबदारी तुमची. आम्ही तर छोटी माणसं. तीन मंत्री दहा आमदार, तीन खासदार असं दोन हाताला बांधल्यानंतर आमच्या गरीबांची काय आवश्यकता आहे असा टोला मुश्रीफांनी लगावला.

निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीने असं झालंय हे बरोबर नाही. पुढच्या सभेच्या तारखेला महायुतीचे संचालक उपस्थित राहतील. गोकुळमध्ये राजकीय पायतान बाहेर ठेवू. गोकुळमधील बोनस आणि फरक प्रशासक देतील. काही काळजी करू नका असा विश्वास देखील मुश्रीफ यांनी दिला.

Hasan Mushrif Vs Satej Patil
Satej Patil Gokul Chairman: 'हे कुठेतरी थांबलं पाहिजे' ही तर महायुतीच्या संचालकांचीच इच्छा; सतेज पाटलांनी बॉम्ब टाकला

ते पुढे म्हणाले की, 'राजकारण सगळीच करत असतात. नुसतं आता ढोंग करून उपयोग नाही. भविष्यात शशिकांत पाटील चुयेकर अध्यक्ष होतील. गोकुळमध्ये समविचारी आघाडीचा चेअरमन झाला. मग आता ते उच्च न्यायालयात का गेले आहेत? असा खोचक प्रश्न देखील मुश्रीफ विचारायला विसरले नाहीत. मात्र त्यानंतर सतेज पाटील माझे मित्रच आहेत असं सांगितलं.

त्यांनी राज्यात सध्या सुरू असेलल्या आरोप प्रत्यारोपांवरून महायुतीच्या तीन्ही पक्षात सुसंवाद नाही असं वक्तव्य करत पुढच्या काळात अडचणी येतील असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.