Mahakave gramstha protest Kagal : 'त्या' मुलीला पालकांच्या ताब्यात द्या; महाकवे ग्रामस्थांचे कागल पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन

या संवेदनशील प्रकरणामुळे कागल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे
Mahakave gramstha protest Kagal : 'त्या' मुलीला पालकांच्या ताब्यात द्या; महाकवे ग्रामस्थांचे कागल पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन
Published on
Updated on

कागल: महाकवे (ता. कागल) येथील एका समाजातील बेपत्ता झालेल्या मुलीला तात्काळ तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात द्यावे आणि तिला पळवून नेणाऱ्या संशयितावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आज महाकवे येथील ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन सुरू केले. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात महिला व पुरुषांसह सुमारे १०० ते २०० ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Mahakave gramstha protest Kagal : 'त्या' मुलीला पालकांच्या ताब्यात द्या; महाकवे ग्रामस्थांचे कागल पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन
Kalyan News | कल्याणातील ४ शाळकरी मैत्रिणींनी घरातून पळून जाऊन थेट गाठले राजस्थान !

नेमके प्रकरण काय?

दोन दिवसांपूर्वी महाकवे येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर ती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतले होते, मात्र संबंधित मुलीने पालकांसोबत जाण्यास नकार दिला. कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी अखेर त्या मुलीची रवानगी कोल्हापूर येथील सुधारगृहात (महिला बालकल्याण केंद्र) केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट पोस्ट व्हायरल होत असल्याने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

Mahakave gramstha protest Kagal : 'त्या' मुलीला पालकांच्या ताब्यात द्या; महाकवे ग्रामस्थांचे कागल पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन
Gadchiroli News | जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट आदेशप्रकरणी नगरसेवक आशिष पिपरेला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

"जोपर्यंत संबंधित मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले जात नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या दारातून हटणार नाही," असा आक्रमक पवित्रा घेत संतप्त ग्रामस्थांनी सकाळीच कागल पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला.

Mahakave gramstha protest Kagal : 'त्या' मुलीला पालकांच्या ताब्यात द्या; महाकवे ग्रामस्थांचे कागल पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन
Pune Crime: पुण्यात भोंदूबाबाचा 17 वर्षांचा अत्याचार; उच्चशिक्षित तरुणीवर अमानुष छळाचा धक्कादायक प्रकार

राजकीय नेत्यांची मध्यस्थी अपयशी आंदोलनाची तीव्रता पाहून काही स्थानिक राजकीय प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पोलिसांच्या वतीने जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याबाबत कायदेशीर मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, संतप्त जमावाने हा प्रस्ताव फेटाळून लावत मुलीला तात्काळ हजर करण्याच्या मागणीवर ठाम राहत आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. या संवेदनशील प्रकरणामुळे कागल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news