Madhuri Elephant Return : ‘माधुरी’चे कोल्हापूरात जल्लोषात स्वागत; तब्बल 409 दिवसानंतर स्वगृही नांदणीत परतली!

Madhuri Elephant Return :
Madhuri Elephant Return : ‘माधुरी’चे कोल्हापूरात जल्लोषात स्वागत; तब्बल 409 दिवसानंतर स्वगृही नांदणीत परतली!सिद्धू गावडे
Published on
Updated on

शेखर पाटील

कोल्हापूर : राज्यालाच नव्हे तर देशाला प्रतीक्षा लागून राहिलेल्या नांदणी (ता.शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची महादेवी उर्फ माधुरी हत्तीण अखेर परतली आहे. तब्बल 409 दिवसानंतर 1160 किलोमीटरचा प्रवास करून शुक्रवारी माधुरी हत्तीण नांदणीत परतली. तत्पुर्वी माधुरी हत्ती नांदणीतल्या पुनर्वसन केंद्रामध्ये पोहचण्यापूर्वी तिच्या स्वागतासाठी पुनर्वसन केंद्राच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळांची आरास घालण्यात आली होती. शिवाय पुनर्वसन केंद्राच्या बाहेर विद्युत रोषणाई करण्यासत आली होती.

माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी बुधवारी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी झाली होती. यात नांदणी मठ, वनतारा, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने उच्चस्तरीय समितीला नांदणी मठात उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती देऊन माधुरी हत्तीणीला परत देण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर बुधवारी रात्री उच्चस्तरीय समितीने माधुरी हत्तीणला नांदणी येथे नेण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे हतीणीच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार गुरुवारी नांदणी मठाकडून गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात हत्तीण माहुतसह मठाचे प्रतिनिधी वनतारा येथे पोहोचले. उच्चस्तरीय समितीने दिलेल्या परवानगीची कार्यवाही यावेळी करण्यात आली.

नांदणी मठाकडून वाहतुक परवाना (टीपीसह) त्यानंतर कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करून सायंकाळी सव्वापाच वाजता ॲनिमल अंम्बुलन्समध्ये महादेवी हत्तीणीला घेऊन वनताराचे 40 जणांचे पथक नांदणीकडे प्रस्थान केले होते.

1992 पासून माधुरीला मान

इ.स. 701 मध्ये स्थापन झालेल्या नांदणी पीठाच्या अधिपत्याखाली दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील तब्बल 743 गावे येतात. प्राचीन काळापासून मठात चालत आलेल्या हत्ती परंपरेचा मान 1992 सालापासून ‘महादेवी’ने अत्यंत अखंडपणे सांभाळला. मठातील धार्मिक विधी, मिरवणुका आणि पंचकल्याणक सोहळ्यांची शान असलेली महादेवी केवळ एक प्राणी नव्हती, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि आपुलकीचा मुख्य आधार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news