LPG Crisis: हजाराचा सिलिंडर परवडला... गॅसच्या तुलनेत चूल महागच! एका शेणी मागचं गणित परवडेना

LPG Crisis
LPG Crisispudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : शेखर पाटील (पुढारी न्यूज)

सध्या राज्यात कमर्शियल गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य जनता पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळू लागली आहे. मात्र, गॅसच्या तुलनेत चुलीवर जेवण बनवणे आता सर्वसामान्यांच्या खिशाला दुप्पट महाग पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करण्यात आलेल्या एका पाहणीतून हे 'इंधन गणित' उघड झाले आहे.

LPG Crisis
Gas Cylinder Shortage: आखाती युद्धाचा परिणाम; पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाई, सिलिंडर काळ्या बाजारात महाग

गॅस स्वस्त, चूल महाग! कसं आहे गणित?

सामान्यतः चार जणांच्या कुटुंबाला १००० रुपयांचा एक गॅस सिलिंडर महिनाभर पुरतो. मात्र, याच चार जणांच्या कुटुंबाला महिनाभर चुलीवर जेवण करायचे असल्यास लागणाऱ्या शेणी (गोवऱ्या) आणि लाकडाचा खर्च तब्बल २,००० रुपयांच्या घरात जात आहे. म्हणजेच, गॅसच्या तुलनेत चुलीचे इंधन दुप्पट महाग पडत आहे.

LPG Crisis
LPG Gas Crisis | वडगावात गॅस टंचाईचा परिणाम; चहा-भजी गाड्यांवर चुलींचे आगमन

ग्रामीण भागातील शेणींना मागणी वाढली

कोल्हापूरच्या ग्रामीण भागात आजही शेणी लावण्याची परंपरा कायम आहे. गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आता ग्रामीण भागातून शेणी आणि लाकूड विकत घेण्याकडे कल वाढवला आहे. अनेक ठिकाणी तर हॉटेलबाहेर पुन्हा एकदा चुली मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

LPG Crisis
LPG Price: जर इराण-अमेरिका युद्ध संपलं नाही, तर गॅस सिलिंडरच्या किंमती किती रुपयांनी वाढणार?

कष्ट आणि खर्च दोन्ही जास्त

कोल्हापूरजवळील एका गावात शेणी लावण्याचे काम करणाऱ्या महिलांनी सांगितले की, "पाच-सहा जनावरांचे शेण गोळा करणे, वैरण आणणे आणि रोज १०० शेणी लावणे यासाठी प्रचंड कष्ट लागतात. १००० शेणी साधारणपणे १५ दिवस पुरतात. आजच्या काळात १००० शेणींची किंमत पाहता, गॅस वापरणे कधीही परवडले असते, पण गॅस मिळत नसल्याने नाईलाजास्तव हा खर्च करावा लागत आहे."

शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला आता होळी (शिमगा) आणि स्मशानभूमीसाठी लागणाऱ्या शेणींच्या विक्रीतून थोडे उत्पन्न मिळत असले, तरी घरगुती वापरासाठी मात्र हे इंधन महागात पडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news