Kolhapur news | अख्खं आयुष्य सरलं, तरी डोईवरचा हंडा उतरेना!

शाहूवाडीतील ३१ वाड्यांवर पाण्यासाठी जीवघेणा 'रात्रीस खेळ'
Kolhapur news | अख्खं आयुष्य सरलं, तरी डोईवरचा हंडा उतरेना!
Published on
Updated on

सुभाष पाटील

विशाळगड : २१ व्या शतकात भारत विकासाच्या गगनभरारीच्या गप्पा मारत असताना, शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवर मात्र आजही पाण्यासाठीचे 'भीषण वास्तव' काळजाचा थरकाप उडवणारे आहे. "अख्खं आयुष्य सरलं, तरी डोईवरचा हंडा उतरलाच न्हाय," ही एका वृद्ध माऊलीची आर्त हाक येथील दाहकता आणि प्रशासकीय उदासीनता चव्हाट्यावर आणत आहे.

Kolhapur news | अख्खं आयुष्य सरलं, तरी डोईवरचा हंडा उतरेना!
Chandwad Water Scarcity | चांदवड-सुरगाणा तहानेने व्याकुळ! 12 गावे अन् 7 वाड्यांना टँकरचा आधार, हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ वणवण

निसर्गतः पर्जन्यदार आणि पाणीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूवाडी तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. सूर्यदेव आग ओकू लागल्याने दिवसा पाणी शोधणे म्हणजे 'अग्निदिव्यच' ठरत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नैसर्गिक जलस्रोत आटले असून, तांब्याभर पाण्यासाठी नागरिकांना ओढ्यातील झऱ्यांवर तासंतास ताठकळत बसावे लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रशासनाच्या समन्वयाभावामुळे अनेक पाणी योजना आज अस्तित्व गमावून बसल्या आहेत.

Kolhapur news | अख्खं आयुष्य सरलं, तरी डोईवरचा हंडा उतरेना!
Water Crisis: उन्हाच्या झळा अन्‌‍ पाण्यासाठी तगमग

​नैसर्गिक जलस्रोत आटल्याने आणि प्रशासनाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने ३१ वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे भीषण संकट ओढवले आहे. दिवसभर शेतात राबणाऱ्या माय-भगिनींना रात्रीच्या भयाण शांततेत पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. कधी टँकर तर कधी नैसर्गिक झऱ्याच्या प्रतीक्षेत येथील महिला आणि चिमुरड्यांना रात्रभर जागून काढावी लागत आहे.

Kolhapur news | अख्खं आयुष्य सरलं, तरी डोईवरचा हंडा उतरेना!
Pathardi Water Crisis: पाथर्डी शहरात भीषण पाणीटंचाई; 8 दिवसांपासून नळ कोरडे

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते जून या कालावधीसाठी एकूण ३० लाख ५० हजारांचा टंचाई निवारण आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. ​वारंवार मागण्या करूनही केवळ आश्वासनांचे 'गाजर' मिळाल्याने आता ग्रामस्थांच्या संयमाचा बांध सुटला आहे. प्रशासनाने आता केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी; अन्यथा पाण्यासाठीचा हा 'रात्रीस खेळ' तीव्र आंदोलनाचे हिंसक रूप धारण करेल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Kolhapur news | अख्खं आयुष्य सरलं, तरी डोईवरचा हंडा उतरेना!
Water Shortage: मोखाड्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा; पाण्याच्या 3 टाक्या तरीही टँकरने पाणीपुरवठा

या ठिकाणी भीषण पाणीटंचाई

मानोली पैकी कोळेकरवाडी, परखंदळे (मांडलाईवाडी ), शित्तुर वारूण (ढवळेवाडी, राघुचा धनगरवाडा, पगुचा धनगरवाडा ), वालूर पैकी धाऊरवाडा, उखळू पैकी (धनगरवाडा, अंबाईवाडा), कांडवण धनगरवाडा, भाडळे पैकी व्हरकटवाडी, आंबार्डे पैकी करपेवाडी धनगरवाडा, गजापूर पैकी भाततळी, माणगाव पैकी कांरडेवाडी, सुपात्रे पैकी हणमंतवाडी, मांजरे, ऐनवाडी खेळता धनगरवाडा, पणुद्रे पैकी माळवाडी, परळे पैकी मुटकलवाडी, आंबा पैकी चाळणवाडी, घुगुंर सावरेवाडी, साळशी पैकी पोवारवाडी, शिराळे तर्फ मलकापूर, शिराळे तर्फ मलकापूर पैकी (कळकेवाडी).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news