Kolhapur Warna Leopard: वारणा कापशी कॉलनी परिसरात मादी बिबट्यांचा दोन पिलांसह वावर, लोकांमध्ये भितीचे वातावरण

Kolhapur Warna Leopard
Kolhapur Warna Leopardpudhari
Published on: 
Updated on: 

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा

वारणा कापशी ता शाहूवाडी येथील  कॉलनी आणि कापशी-शिरगाव रस्ता परिसरात मादी बिबट्या आपल्या दोन पिलांसह वावरत  आहे काही लोकांना त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kolhapur Warna Leopard
Leopard Terror : शिराळा तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ!

गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचा या भागात मुक्काम असल्याने स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले भगवान कुंभार, तानाजी सनगर, दिनकर पोतदार आणि अशोक ओतारी यांना अगदी  ५० मीटर अंतरावर मादी बिबट्या तिच्या दोन पिलांसह दिसून आली.

Kolhapur Warna Leopard
Hanmantgaon Leopard Terror: हणमंतगावात बिबट्याची दहशत कायम; चिमुकल्यावर झेप घेण्याचा प्रयत्न, बहिणीच्या प्रसंगावधानाने जीव वाचला

​या मुख्य मार्गावर दररोज ग्रामस्थ, शेतकरी आणि कामगारांची मोठी वर्दळ असते. ​पहाटेच्या वेळी शेतात जाणारे शेतकरी आणि वॉकसाठी जाणारे नागरिक बिबट्याच्या भीतीने प्रचंड दहशतीखाली आहेत.

​वन विभागाने परिसरात तातडीने गस्त वाढवावी तसेच ​बिबट्याचा वावर असलेल्या संभाव्य ठिकाणी पिंजरा लावून त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करावे अशी मागणी लोकांच्यातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news