कोल्हापूर : पुलाची शिरोली येथील ग्रामविकास अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक

कोल्हापूर
कोल्हापूर

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भावकु भोगण (वय ५०, रा. गंगाधाम सोसायटी, कोल्हापूर) याच्यासह साथीदारास ४ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शामराव उर्फ भारत बापू परमाज (६०) असे साथीदाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.९) दुपारी चारच्या सुमारास घडली.

याबाबत अधिकची माहिती अशी की, तक्रारदार यांनी आपल्या घराशेजारील चिकन दुकानाचा त्रास होतो. त्यामळे अतिक्रमण काढण्यासाठी भोगण यांच्याकडे विनंती अर्ज ग्रामपंचायती मार्फत केला होता. शिरोली ग्रामपंचायतचा ग्रामविकास आधिकारी भोगण याने शिरोली मधील अतिक्रमण काढण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती.‌ याबाबत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला कळविले होते. त्यानुसार हे पथक गूरुवारी शिरोली ग्रामपंचायत चौकात दाखल झाले आणि दबा धरून बसले होते.

गुरुवारी याबाबत तक्रारदाराने तडजोडीअंती ४ हजार रुपये देण्याचे कबुल केले. दुपारी चार वाजता भोगण यांच्या शेजारी बसलेल्या एजंट शामराव उर्फ भारत बापू परमाज याच्या हातात पैसे दिले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामपंचायतीमध्ये जात दोघांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव बंबरगेकर, विकास माने, रुपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव, यांनी केली.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news