

मुदाळतिट्टा: पुढारी वृत्तसेवा : अवचितवाडी (ता. कागल) येथील उपराळा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. गेली पाच वर्षे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून 31.84 मीटर उंची सांडव्या वरून पाण्याचा विसर्ग होत आहे. या तलावामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर 600 एकर शेती ओलिताखाली येणार आहे.
तलावाची उंची 32 मीटर असून 300 मीटर लांबीची भिंत आहे. 5.33 चौ. कि.मी पाणलोट क्षेत्र आहे. तलावात 51 एकर बुडीत क्षेत्र आहे. तर तलावात 49.89 द. ल.घ इतका पाणीसाठा होतो. 83 मीटर लांबीचा सांडवा आहे. गेल्या वर्षी हा तलाव 7 ऑगस्टरोजी पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षी 28 जुलैरोजी पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.
हेही वाचा