Tractor Trolley Black Box: आता ट्रॅक्‍टर ट्रॉलीलाही लागणार ब्‍लॅक बॉक्‍स; केंद्र सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध

MLA Satej Patil Press Conference: आमदार सतेज पाटील यांचा केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात एल्‍गार
Tractor Trolley
Tractor Trolley Pudhari
Published on
Updated on

MLA Satej Patil On Tractor Trolley Black Box Decision

कोल्‍हापूर : क्रेंद्र सरकारने एक नवा निर्णय जाहीर केला असून याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे. या नव्या निर्णयामुळे आता शेतकर्‍यासाठी महत्‍वाचे वाहन असलेल्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीला विमानाप्रमाणेच ब्लॅक बॉक्स लावावा लागणार आहे. ब्लॅक बॉक्स सह जीपीएस लावण्याचा निर्णय घेणार आहे. या निर्णयाची माहिती कळताच कोल्हापुरातून याला विरोध सुरु झाला आहे. क्रेंदाने जाहीर केलेल्‍या प्रत्‍येक निर्णयामुळे ट्रॅक्‍टर ट्रॉलीधारकाला ५० हजाराचा भुर्दंड बसणार आहे.

Tractor Trolley
Black Box | ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय? तो कुणी बनवला?

विधान परिषदेचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून या गोष्‍टीला कडाडून विरोध केला आहे. पत्रकार परिषदेत बोलतना पाटील यांनी राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून करणार जोरदार विरोध करणार असल्‍याचे जाहीर केले आहे.

देशभरातील ट्रॅक्टर, ट्रॉलीला निर्णय बंधनकारक : हा नवीन देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर, ट्रॉलीला निर्णय केला बंधनकारक केला असून शेतकर्‍याच्या डोक्‍यावर चांगलाज बोजा पडणार आहे. ऊस वाहतूकदार, नागरंट करणारे ट्रॅक्‍टर यांना हा भूर्दंड बसणार आहे.
असा असेल नवीन प्रणाली बसवण्याचा खर्च
ट्रॉली साठी नवीन कॅपलिंग आणि कनेक्टर खर्च 5000 ते 10000 ,ब्लॅक बॉक्स (ईडीआर इव्हेंट डेटा रेकॉर्डर) खर्च 15000 ते 25000, जीपीएस ट्रेकिंग डिव्हाईस (खर्च 8 हजार ते 15 हजार)
Tractor Trolley
जाणार्‍यांना जाऊद्या, येणार्‍यांसोबत निवडणूक जिंकू : आमदार सतेज पाटील

वेळ पडल्यास आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढू - सतेज पाटील

या निर्णयाला विरोध करताना सतेज पाटील यांनी सांगितले की सोशल मिडियावर आम्ही याला हरकती नोंदविण्याची आवाहन केलं आहे. हा कायदा येऊ पाहत आहे त्याला आत्ताच हरकती घेत आहे, ट्रॅक्टर ला ब्लॅक बॉक्स बसवायची आयडिया कोणाच्या डोक्यातून आली हे कळायला मार्ग नाही,

लोकांना आधीच हमीभाव नाहीये त्यात हा 25 हजारांपर्यंत आर्थिक बोजा येणार आहे. त्‍यामूळे 18 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी हरकती घ्याव्यात , निर्णय होण्याआधी हरकती व्हाव्यात याबाबत आम्ही आवाहन पाटील यांनी केला आहे. हा देशव्यापी विषय आहे त्यामुळे आम्ही आता शेतकऱ्यांना आवाहन करत आहे असेही ते म्‍हणाले. सरकारने हा निर्णय मागे नाही घेतला तर आम्‍ही वेळ पडल्यास आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढू असा इशाराही दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news