Visarjan Miravnuk: विसर्जन मिरवणुकीत 'रेंगाळणं' पडलं महागात; १० वर्षापूर्वीच्या प्रकरणात ट्रॅक्टर मालकाला कोर्टाचा दणका

२०१६ मध्ये गणेश तरुण मंडळाच्या मिरवणुकीतील घटना
Kolhapur Crime News
मिरवणूक रेंगाळल्याप्रकरणी ट्रॅक्टर मालकास १ वर्ष कारावास
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करून मिरवणूक रेंगाळणाऱ्या ट्रॅक्टर मालकास न्यायदंडाधिकारी पंकजा राजपूत यांनी दोषी ठरवत १ वर्षे कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अजित बाजीराव पाटील (रा. ननुंद्रे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. राजारामपुरीत २०१६ मध्ये गणेश तरुण मंडळाच्या मिरवणुकीत ही घटना घडली होती. यापूर्वी राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मंडळाच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनाही शिक्षा झाली आहे. (Ganesh Visarjan Miravnuk 2016)

Kolhapur Crime News
Kolhapur Ganesh Festival | देखावे पाहण्यासाठी शहरवासीय रस्त्यावर

राजारामपुरी येथील गणेश तरुण मंडळाने २०१६ मध्ये मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोडमार्गे मिरवणुकीचे आयोजन केले होते. त्यांच्या साऊंडचे नमुने घेतले असता मर्यादेपेक्षा अधिक आवाज असल्याचे आढळून आले होते. तसेच मिरवणूकही बराच काळ रेंगाळत ठेवली होती.

Kolhapur Crime News
Kolhapur Crime : शिरोळ येथे तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन वृद्धेचा मृत्यू

याप्रकरणी ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० चे कल ३ (१), ४(१), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ६ व १५, भादंविस कलम १८८ प्रमाणे मंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजानीस, सचिव यांच्यासह ट्रॅक्टर मालक- चालकावर गुन्हा दाखल झाला होता.

Kolhapur Crime News
Kolhapur News : किणी-वाठार-घुणकी परिसरात बिबट्याची दहशत

सरकारी वकील सायली ठोकळ यांनी केलेल्या युक्तिवादावरून पदाधिकाऱ्यांना दोषी ठरवले होते. बुधवारी ट्रॅक्टर मालक अजित पाटील यालाही दोषी ठरवले. जुना राजवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक किरण लोंढे, कोर्ट पैरवी अंमलदार विशाल तळेकर, अंकुश पाटील, हवालदार धोंडिराम शिंदे यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news