Kolhapur Crime : शिरोळ येथे तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन वृद्धेचा मृत्यू

१२ वर्षीय नातवाचा जीव वाचला
Kolhapur Crime News
शिरोळ येथे तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन वृद्धेचा मृत्यू
Published on
Updated on

जयसिंगपूर : शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या माने गल्लीत तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने रत्नाबाई धोंडिराम माने (वय ७८) यांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यांच्या १२ वर्षीय नातवाचा जीव वाचला.

रत्नाबाई माने या चूल पेटविण्यासाठी जळण घेत असताना जळणावर पडलेल्या विजेच्या तारेचा त्यांच्या हाताला स्पर्श झाला. त्यांना जोराचा विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सारिका अरविंद माने, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, दिग्विजय माने, माजी उपसरपंच गोरखनाथ माने, संदीप माने, शशिकांत माने, अरुण माने, राजू माने, सतीश राजमाने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news