Kolhapur News : किणी-वाठार-घुणकी परिसरात बिबट्याची दहशत

शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण; जेरबंद न केल्यास रास्ता रोकोचा इशारा
Kolhapur News
किणी-वाठार-घुणकी परिसरात बिबट्याची दहशत
Published on
Updated on

पेठवडगाव : किणी-वाठार-घुणकी या तिन्ही गावांच्या सीमेवर बिबट्याचा वावर कायम असल्याने शेतकरी व शेतवस्तीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी वाठार येथील कावीचा मळा व देशपांडे मळा परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यानंतर मंगळवारी रात्री किणी-घुणकी हद्दीतील हत्तीमाळ येथे बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

वाठार येथील कावीचा मळा व देशपांडे मळा परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन कुत्र्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली आहे. बिबट्याच्या वावराची माहिती मिळताच नागरिकांनी वन अधिकारी राकेश शिखरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या आढळून आला नाही.

दरम्यान, पाटील वसाहत परिसरात लोडशेडिंगमुळे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने रात्रीच्या वेळी शेतकरी व नागरिकांना शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी वन विभागाला दिला आहे. याबाबत उमेश पाटील, बाबुराव माळी, बजरंग पाटील, बाबुराव पाटील, विकास चौगुले, सुरेश पाटील, कृष्णात पाटील, माणिक पाटील व गजानन कुंभार यांनी वन विभागाकडे मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news