कोल्हापूर: पावसामुळे टोप, कासारवाडी रस्त्यावर पाणी, चालकांची कसरत

कोल्हापूर: पावसामुळे टोप, कासारवाडी रस्त्यावर पाणी, चालकांची कसरत
Published on
Updated on

कासारवाडी: पुढारी वृत्तसेवा :  कासारवाडीसह परिसरातील गावामध्ये रविवारी (दि.१६) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धुवाँधार पाऊस झाला. यामुळे टोप कासारवाडी रस्त्यावर सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना कसरत करावी लागली.

राष्ट्रीय महामार्गलगत टोपजवळून कासारवाडी फाटा जाणारा हा रस्ता सादळे-मादळे, गिरोली, जोतिबामार्गे वाघबीळावर जातो. या रस्त्यावर नेहमीच पर्यटकांची, भाविकांची  व शाळा कॉलेजला जाणारी मुले व कामगार वर्गाची गर्दी असते. या फाट्यावर आजूबाजूच्या परिसरातील बाजूच्या परिसरातील व नागरी वस्तीतील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने प्रत्येक पावसात येथे वाहन चालकांना कसरत करावी लागते. काही वेळा दुचाकी बंद पडतात. तर चालत जाणाऱ्या शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठी अडचण होते. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमचाच बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालकांतून होऊ लागली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news