कोल्हापूर : कलनाकवाडी येथे बुलेटच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : कलनाकवाडी येथे बुलेटच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : गारगोटी-कोल्हापूर रोडवरील कलनाकवाडी नजीक भरधाव बुलेटच्या धडकेत
पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी ज्ञानदेव पावले (वय-७५, रा. कलनाकवाडी, ता. भुदरगड) असे या पादचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गारगोटी-कोल्हापूर रोडवरील कलनाकवाडी येथे शिवाजी पावले रस्त्याच्या बाजूने जात होते. यावेळी सुशांत पांडुरंग माने (रा. कोतोली पैकी मानेवाडी, ता. पन्हाळा) हा बुलेटवरून पाठीमागून येत होता. भरधाव बुलेटचे नियंत्रण सुटल्याने शिवाजी पावले यांना बुलेटची जोराची धडक बसली.  या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा गजानन पावले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके करत आहेत.

 

Back to top button