Kolhapur Accident | कोल्हापूरमध्ये स्पीड ब्रेकरमुळे तीन वाहने एकमेकांवर आदळली; सुदैवाने जीवितहानी टळली

स्पीड ब्रेकर स्पष्टपणे दिसत नसल्याने पहिल्या वाहनचालकाने अचानक ब्रेक लावले
Three Vehicle Crash Kolhapur
Three Vehicle Crash KolhapurPudhari
Published on
Updated on

Three Vehicle Crash Kolhapur

कोल्हापूर : शहरातील NCC भवनजवळील नागोबा मंदिर परिसरात मंगळवारी (दि.१४) स्पीड ब्रेकरमुळे तीन चारचाकी वाहनांचा अपघात झाला. स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे नसल्याने चालकांना तो वेळेवर दिसला नाही आणि एकामागोमाग एक अशी तीन कार एकमेकांवर आदळल्या.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रस्त्यावर असलेला स्पीड ब्रेकर स्पष्टपणे दिसत नसल्याने पहिल्या वाहनचालकाने अचानक ब्रेक लावले. त्यानंतर मागून येणाऱ्या दोन वाहनांना वेळेवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि साखळी धडक झाली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Three Vehicle Crash Kolhapur
Kolhapur Accident | सलगर–सदलगा महामार्गावर भीषण अपघात: निवृत्त शिक्षक ठार, एक गंभीर जखमी

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या ठिकाणी स्पीड ब्रेकरवर कोणतेही पांढरे पट्टे किंवा इशारा फलक नसल्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत. अनेक वाहनचालकांना स्पीड ब्रेकर अचानक दिसत नसल्याने त्यांना अचानक ब्रेक मारावे लागतात, ज्यामुळे मागील वाहनांशी धडक होण्याचा धोका वाढतो.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे स्पीड ब्रेकरवर तातडीने पांढरे पट्टे रंगवण्याची आणि योग्य इशारा फलक लावण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळात वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news