Kolhapur Robbery | शिरढोणात घरफोडी: दागिना, रोकड, पितळी भांडी लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

शिरढोण (ता. शिरोळ) येथील कुरुंदवाड रस्त्यावरील एका घरात मध्यरात्री घरफोडी
Shirol Shirdhon Burglary
Shirol Shirdhon Burglary AI Image
Published on
Updated on

Shirol Shirdhon Burglary

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील कुरुंदवाड रस्त्यावरील एका घरात मध्यरात्री घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि पितळी भांडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून कुरुंदवाड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

शिरढोण येथील सुवर्णा कोरे या आपल्या मुलाकडे अधिक-महिना कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या. घरबंद असल्याची संधी साधून ३१ मेरोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दोन चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

Shirol Shirdhon Burglary
Kolhapur crime news: १० मिनिटांत येतो सांगून बाहेर पडला, अन्...; शिरोलीत विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह, खुनाचा संशय!

चोरट्यांनी घरातील सुमारे एक तोळे सोन्याची चैन, सुमारे एक लाख रुपये रोख रक्कम तसेच पितळी भांडी असा ऐवज चोरून नेला. कार्यक्रमावरून परतल्यानंतर आज सकाळी सुवर्णा कोरे यांना घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून त्यांनी तत्काळ कुरुंदवाड पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अज्ञात दोन संशयित दुचाकीवरून टाकवडे बाजूकडून येताना आणि चोरी झालेल्या घराच्या दिशेने जाताना दिसून आले आहेत.

Shirol Shirdhon Burglary
Kolhapur News: घरात घुसून तरुणाचे अपहरण; बेदम मारहाण करून सादळे–मादळे घाटात फेकले

विशेष म्हणजे हे दोघे अवघ्या २४ मिनिटांत चोरी करून परत त्याच मार्गाने निघून गेल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली असून विविध सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news