Kolhapur crime news: १० मिनिटांत येतो सांगून बाहेर पडला, अन्...; शिरोलीत विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह, खुनाचा संशय!

शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका विहिरीत सोमवारी तरुणाचा मृतदेह आढळून आला.
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Kolhapur Shiroli MIDC crime news

नागाव: शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका विहिरीत सोमवारी तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपात असून त्याचा खून झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. फिरोज खानसो मुजावर (वय ४४, रा. महाजन कॉलनी, नागाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Crime News
Dhule Murder | साक्री तालुक्यात तरुण आणि तरुणीची वेगवेगळ्या ठिकाणी खून, भोंदू गिरीतून हत्याकांड?

मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज मुजावर हे ३० मे रोजी १० मिनिटांत येतो, असे घरात सांगून बाहेर पडले होते. मात्र ते परत न आल्याने नातेवाईकांनी शिरोली पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सोमवारी दुपारी येथील वसंत पाटील यांच्या विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना बोलावण्यात आले असता, तो फिरोज मुजावर यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

मृतदेहाची पाहणी केल्यानंतर फिरोज यांची आत्महत्या नसून त्यांचा खून करण्यात आला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या आरोपामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद शिरोली पोलीस रात्री झाली आहे.

Crime News
खुन प्रकरण ! बाजारीवाडा फाट्यावरील तिकटीवर लिंबु-मिरचीचा अघोरी प्रकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news