

कोल्हापूर : जिल्ह्यात मान्सूनपूर्व वातावरण सक्रिय आहे. पुढील सात दिवस ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. कमाल तापमान 32.7, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस होते. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला गुरुवारी (दि. 28) यलो अलर्ट दिला आहे, तर मंगळवारपर्यंत (दि. 2) ढगाळ वातावरण व वादळी पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी असले, तरी आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातील फरक कमी झाल्याने वातावरण अधिक दमट बनले आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते कमी डीटीआर हे मान्सूनपूर्व दमट परिस्थितीचे संकेत मानले जातात.