Kolhapur Tractor Theft | पहाटे ट्रॅक्टर चोरीला, सकाळीच मिळाला परत; सतर्क नागरिकांमुळे चोरट्याचा डाव उधळला

सोशल मीडियावरील संदेश ठरला प्रभावी; शेडशाळ येथे आढळला चोरीला गेलेला ट्रॅक्टर
Sainik Takli Stolen Tractor Recovered
Sainik Takli Stolen Tractor RecoveredPudhari
Published on: 
Updated on: 

Shirol Sainik Takli Stolen Tractor Recovered

सैनिक टाकळी : पहाटेच्या सुमारास चोरट्याने मोठ्या शिताफीने पळविलेला ट्रॅक्टर नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे अवघ्या काही तासांत परत मिळाला. टाकळीवाडी येथील साखर कारखान्याच्या परिसरातून चोरीला गेलेला ट्रॅक्टर शेडशाळ येथे आढळून आल्याने चोरट्याचा डाव उधळला गेला. मात्र, ट्रॅक्टर चोरी करणारा चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

कर्नाटकातून ऊस वाहतूक करणारा KA 23 TA 2324 क्रमांकाचा ट्रॅक्टर टाकळीवाडी येथील साखर कारखान्यात ऊस खाली केल्यानंतर रात्री आठच्या सुमारास कारखान्यापासून काही अंतरावर पार्किंग करण्यात आला होता. या ट्रॅक्टरला दोन ट्रेलरही जोडलेले होते. दरम्यान, पहाटे तीन ते चारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रेलर तेथून पळवून नेले.

Sainik Takli Stolen Tractor Recovered
Kolhapur News : शिरोलीत पोल्ट्री शेडला भीषण आग; दहा लाखांचे नुकसान

सकाळी सहाच्या सुमारास वाहनमालक संजय अण्णाप्पा माळी (रा. देसाई इंगळी) पार्किंगच्या ठिकाणी आले असता त्यांना ट्रॅक्टर आणि ट्रेलर गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र वाहनांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी सोशल मीडियावर वाहन चोरीला गेल्याची माहिती प्रसारित केली. तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्यातही या घटनेची नोंद केली.

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या संदेशामुळे शेडशाळ येथील नागरिक सतर्क झाले. त्यांना संबंधित ट्रॅक्टर शेडशाळ परिसरात आढळून आला. त्यांनी तत्काळ वाहनमालकाला याची माहिती दिली. त्यामुळे चोरीला गेलेला ट्रॅक्टर आणि दोन्ही ट्रेलर परत मिळविण्यात यश आले.

Sainik Takli Stolen Tractor Recovered
Kolhapur Accident News | कष्टाचा संसार क्षणार्धात विस्कटला; पाथरूट बंधूंच्या मृत्यूने दोन कुटुंबांचा आधारवड हरपला

सोशल मीडियावरील माहिती वेगाने पसरल्याने चोरट्याला चोरीचे वाहन लांबवर नेणे शक्य झाले नाही. नागरिकांच्या जागरूकतेमुळे वाहन परत मिळाले असले, तरी चोरी करणारा संशयित अद्याप फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून चोरट्याचा शोध घ्यावा आणि त्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.