

शिरोली एमआयडीसी : पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथील दोन बंद घरांचे दरवाजाच्या कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कमेस ३ लाख ८६ हजाराचा माल लंपास केला. ही घटना रविवारच्या मध्यरात्री मोरे गल्ली व जय शिवराय तालमी येथे घडली तर महामार्गालगत असणाऱ्या हॉटेलमध्येही चोरीचा प्रयत्न झाला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञासह श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.
शिरोली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पुलाची शिरोली येथील मोरे गल्लीत दत्तात्रय बाळासो सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबासह राहत असुन ते शुक्रवारी इस्लामपूर येथे आपल्या सासुरवाडीला कुटुंबासह दोन दिवसांसाठी गेले होते . ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटुन घरात घरातील ६०,०००/- रुपये किंमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, ६०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याच्या दोन अंगठया प्रत्येकी पाच ग्रॅम वजानाच्या ६०००/- रुपये किंमतीचा चांदीचा छल्ला एक, लहान मुलाचे चांदीचे पैजण जोड चोरीला गेले. याचबरोबर दोन चांदीच्या अंगठया दोन जोड, व लहान मुलाचे हातातील चांदीचे कडे चार , ३०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे टॉप्स पाच ग्रॅम वजनाचे व २ लाख ३० हजार रुपये रोख चोरून नेले.
ही घटना रविवारी सकाळी सूर्यवंशी यांच्या घराशेजारील नागरिकाच्या लक्षात येताच त्यानी सुर्यवंशी व शिरोली पोलिसाना फोन करून घटनेबाबत कल्पना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून श्वान पथक व ठसे तज्ज्ञास पाचारण केले पण श्वानाने सांगली फाटा पर्यंत माग दाखवला तर गावातील जय शिवराय तालमीजवळ राहणा-या मिनाक्षी महादेव स्वामी यांचे देखील बंद घराच्या दरवज्याचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन त्याचे घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमेची देखील चोरी केली तसेच पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल आमंत्रण चे कुलुप तोडुन चोरीचा प्रयत्न केला . हि घटना रविवारी मध्यरात्री घडली या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली असून अदिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. एस. एम. संकपाळ करीत आहेत .