Kolhapur Milk Adulteration | शिरढोण-टाकवडे परिसरात दूध भेसळीचे प्रकार; दूध उत्पादक पशुपालकांची फसवणूक

संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
Shirdhon Takwade Milk Scam
Shirdhon Takwade Milk ScamAI Photo
Published on
Updated on

Shirdhon Takwade Milk Scam

शिरढोण : शिरढोण-टाकवडे (ता. शिरोळ) परिसरात दूध भेसळीचे प्रकार वाढल्याची चर्चा असून, ग्राहकांसह दूध उत्पादक पशुपालकांची फसवणूक होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

परिसरातील काही दूध विक्रेते आणि व्यापारी म्हशीच्या दुधात गायीचे दूध तसेच गायीच्या दुधात म्हशीचे दूध मिसळून विक्री करत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय दुधात पाणी मिसळून त्याची विक्री चढ्या दराने केली जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे दूध मिळत असून त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

Shirdhon Takwade Milk Scam
Gokul Milk Union Kolhapur | गोकुळच्या मावळत्या संचालकांना दिलासा! 'त्या' 427 संस्थापैकी 270 संस्था पात्र

स्थानिक पशुपालकांकडून कमी दरात दूध खरेदी करून त्यात भेसळ केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यानंतर हे दूध ग्रामीण आणि शहरी भागात अधिक दराने विकले जात असल्याने एकीकडे ग्राहकांची फसवणूक होत आहे, तर दुसरीकडे दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

दूध भेसळीच्या या कथित व्यवसायातून काही जण मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून संशयित दूध विक्रेत्यांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Shirdhon Takwade Milk Scam
Belagavi Kolhapur railway: बेळगाव-कोल्हापूर रेल्वे मार्ग सर्वेक्षण सुरु

दूध हा दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने संशयित दुधाचे नमुने तपासून सत्यता पडताळावी तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून ग्राहक व पशुपालकांची होणारी फसवणूक रोखावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीमेची गरज

दूध भेसळीबाबत सातत्याने तक्रारी समोर येत असल्याने संबंधित विभागांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यास अशा गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. ग्राहकांचे आरोग्य आणि पशुपालकांचे हित लक्षात घेता प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन दोषींवर प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news