

कोल्हापूर : सुमारे दीडशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या टाऊन हॉल उद्यानात दुर्र्मीळ झाडांची रोपे तयार करण्यात आली आहेत. जुलै 2005 ते आतापर्यंत सुमारे दोन हजार रोपे पर्यावरणप्रेमींनी घेऊन त्यांचे रोपण केले आहे. टाऊन हॉल उद्यानाच्या रोपवाटिकेत प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध प्रकारची रोपे शासकीय दरात उपलब्ध आहेत. उद्यान विभागातर्फे पॉली बॅग व कुंड्यांमध्ये छोटी-मोठी रोपे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उद्यान अधिक्षक जयेंद्र पानसरे यांनी सांगितले.
स्थानिक प्रजातींची रोपे : शतावरी, कर्दळ, अबोली, जास्वंद, रताळ वेल, कडीपत्ता, मोगरा, कण्हेर, पारिजातक, तगर, मधुमालती, गुलाब, रातराणी, हंगामी फुलझाडांची रोपे, मोरपंखी, सदाफुली, तुळस, अशोक, बळकुळ, बेल, करंज, ताम्हण, कडूलिंब.
विदेशी / शोभेची रोपे : ॲकॅलिफा, ॲग्लोनेमा, अलामंडा, अलोकेशिया, अरेलिया, अल्टरनेन्थेरा, बिगीनिया, बोगनविलिया, सिसलपिनिया, कोलियस, क्रोटन, डायफेनबेकीया, ड्यूरांटा, इरॅन्थेमम, ड्रेसीना, एक्सोकेरिया बायकलर, फर्न, गार्डेनिया, हेमॅलोनेमा, हेमेलिया पेट्न्स, हेलिकोनिया, जास्मिनम, जट्रोफा, क्रिस्टीयाना, लॅटेना, लिली, मरांटा, अँथुरियम, मॉन्स्टेरा, मॉस्टीक वनस्पती, ओपीओपोगॉन, अरेका पाम, पाम, पेंटास, पेपरोमिया, ट्रेडेस्कॅनशिआ, पोर्चुलाका, फिलोडेंड्रान, प्लंबॅगो, पोथोस, मनी प्लांट, पॅन्डानस, थनबर्जीया, सॅन्सीवॉरिया, स्पॅथीफायलम, टीकोमा, फायलॅथस, व्हर्बेना, वडेलिया, फायकस, रेन ट्री.