Sangli Teacher Death | तिरंग्याला सलाम करतानाच काळाचा घाला; कोकरुडमध्ये शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू

कोकरुडमध्ये (ता.शिराळा) स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्दैवी घटना; १९ वर्षांची सेवा अचानक थांबली
Sangli Kokrud Teacher Heart Attack
मनोहर कांबळे Pudhari
Published on
Updated on

Sangli Kokrud Teacher Heart Attack

बांबवडे : स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सर्वत्र असतानाच एका शिक्षकावर काळाने घाला घातला. शिराळा तालुक्यातील कोकरुड येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शिस्तीत उभे करत असताना मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक मनोहर शामराव कांबळे (वय ४५, रा. नेर्ले, ता. शाहूवाडी) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने कोकरुड परिसरासह शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

कांबळे गेल्या १९ वर्षांपासून मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक विद्यालयात निष्ठेने सेवा बजावत होते. शांत, मनमिळाऊ आणि विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते जपणारे शिक्षक म्हणून ते परिचित होते.

Sangli Kokrud Teacher Heart Attack
Sangli Crime: पुण्यातून वृद्धाचे अपहरण; सांगलीत आणून खून

शनिवारी सकाळी शाळेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर कोकरुड बाजारपेठेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी स्वातंत्र्यगीत सादर करत असताना कांबळे स्टेजसमोर लहान मुलांना शिस्तीत उभे करत होते. त्याचवेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.

उपस्थित शिक्षक व युवकांनी तत्काळ धाव घेत त्यांना सावरले. त्यांना जवळच्या घरात नेऊन साखरेचे पाणी देण्यात आले. काही वेळाने त्यांना थोडे बरे वाटल्याने ते उठून बसले. मात्र, काही क्षणांतच त्यांना पुन्हा तीव्र हृदयविकाराचा झटका आला. उपस्थितांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.

Sangli Kokrud Teacher Heart Attack
Sangli Accident: रेणावी घाट अपघात; मृतांची संख्या ३ वर

विद्यार्थ्यांसमोर आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला वंदन करत असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने उपस्थितांना मोठा धक्का बसला. शिक्षक अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कोकरुड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कांबळे यांच्या पश्चात वृद्ध आई, दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news