अचानक यू टर्न घेतलेल्या रिक्षाचा विनाचालक थरार

अचानक यू टर्न घेतलेल्या रिक्षाचा विनाचालक थरार
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गजबजलेल्या रस्त्यावर शनिवारी सकाळी अचानक रिक्षाने यू टर्न घेतला. पाठीमागून सुसाट आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने रिक्षाचालक बाहेर फेकला गेला. हँडल लॉक झाल्याने विनाचालकच रिक्षा घुमू लागली. पुन्हा दुचाकीला धडक दिली. अवघ्या तीस सेकंदांत घडलेल्या या विचित्र अपघात केवळ दैव बलवत्तर म्हणूनच किरकोळ जखमीवर निभावले. शाहूपुरीतील पत्की हॉस्पिटलसमोर घडलेल्या या विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. राजारामपुरीत जाणार्‍या केएमटी बसचा मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ असते. शनिवारी सकाळची वेळ असल्याने फारशी वर्दळ नव्हती. अचानक बी. टी. कॉलेजकडून शाहूपुरीत जाणार्‍या रिक्षाने यू टर्न घेतला. अचानक रिक्षा आडवी आल्याने पाठीमागून येणार्‍या दुचाकीस्वारास दुचाकी आवरली नाही. त्यामुळे दुचाकीची थेट रिक्षाला धडक बसली. यामुळे दुचाकीवरील पती-पत्नी खाली पडले. धडक इतकी जोरात होती की, रिक्षातून रिक्षाचालकही बाहेर फेकला गेला. काही कळायच्या आत दुसरी दुचाकी रिक्षाला धडकली. हँडल लॉक झाल्याने रिक्षा वळून पुन्हा पाठीमागे येताच दुचाकीवरून पडलेली महिला रिक्षाच्या चाकाखाली जाणार एवढ्यात पतीने त्यांना ओढून बाजूला केले.

अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी जखमींना पाणी देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बाजूला पार्किंग केलेल्या दुचाकीला धडक देऊन रिक्षा थांबली. ही धडक बसली नसती तर रिक्षा थेट बेसमेंटमध्ये असणार्‍या हॉटेलमध्ये घुसली असती. हा प्रकार पाहून हॉटेल मालक आणि ग्राहकांना चांगलाच झटका बसला. यामध्ये दोघेजण किरकोळ जखमी झाले असून अपघाताची नोंद झाली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news