Kolhapur Rains | कोल्हापूरकरांना महापुराची धास्ती, पंचगंगा पातळीत वाढ, ६५ बंधारे पाण्याखाली, जाणून घ्या कोणते मार्ग बंद?

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे
Kolhapur Rains
कोल्हापूर- गगनबावडा महामार्गावर मांडूकली येथे रस्त्यावर पाणी आले आहे. (Source- @Info_Kolhapur)
Published on
Updated on

Kolhapur Rains

कोल्हापूरसह घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मंगळवारी (दि.१९ ऑगस्ट) सकाळी ७ वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ३४.०९ फुटांवर होती. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट आहे. तर जिल्ह्यातील ६५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर - गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर मांडूकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दस्तुरी चौक, कळे येथे बॅरिकेट लावण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर - राजापूर हा राज्य मार्ग बाजारभोगाव या ठिकाणी पाणी आल्यामुळे बंद झाला आहे.

Kolhapur Rains
Ratnagiri Rain: राजापूरला पुराचा वेढा; घाटमाथ्यावर जाणारी वाहतूक बंद

अणुस्कुरा घाट वाहतुकीस बंद

आज सकाळी अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला आहे. आज दुपारपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Kolhapur Rains
Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईकरांची दैना; शहरासह उपनगरात पाणीच पाणी

पाचवडे येथे कालव्याचे पाणी घरात शिरण्याचा धोका

भुदरगड तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. पाचवडे गावात कालवा भरून वरून पाणी वाहत आहे. यामुळे पंचसदस्य उदय देसाई यांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका आहे. येथील कालव्याजवळ असलेल्या इतर घरांनाही धोका निर्माण झाला आहे.

Kolhapur Rains
पाचवडे गावात कालव्याचे पाणी घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. (Pudhari Photo)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news