Mumbai Rain
मुंबई : मुंबई शहर व उपनगरात पावसाचा जोर कायम असून आज पहाटे ५ ते ७ या दोन तासात दिंडोशी, मालाड, गोरेगाव, ओशिवरा, अंधेरी या भागात सर्वाधिक ३५ ते ४० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे अंधेरी सबवेसह पश्चिम उपनगरातील अनेक भागात पाणी तुंबले आहे.
पूर्व उपनगरातील भांडुप, मुलुंड, पवई चेंबूर भागातही पावसाचा जोर जास्त आहे. मुंबई शहर विभागात वरळी, दादर आदी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हिंदमातासह सायन दादर आदी भागात पाणी तंबू लागले आहे. दरम्यान गेल्या २४ तासात शहरात १७८.५६ मिमी, पूर्व उपनगरात १९०.५० मिमी व पश्चिम उपनगरात २२०.८२ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कायम असल्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेची उपनगरीय वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यावरील वाहतूक मंदावल्यामुळे काही रस्त्यांवर वाहतूक कोंडी बघायला मिळाली.