Kolhapur News | रहस्यमय' रस्ता नव्हे, तर नजरेचा भ्रम: रक्षादेवी मंदिराजवळ चारचाकी पुढे सरकण्याचा दावा PWD ने फेटाळला

राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील रक्षादेवी मंदिराजवळील रस्त्यावर चढ असतानाही न्यूट्रलमध्ये चारचाकी गाडी मॅग्नेटिक पॉईंटमुळे पुढे सरकली
 Bhudargad Rakshadevi Temple Road
वाकीघोल परिसरातील हाच तो चर्चेचा रस्ता ; तर रस्त्याची लेवल तपासताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता महेश कांजर, शाखा अभियंता संतोष पाटील, सागर कुंभार.Pudhari
Published on
Updated on

Bhudargad Rakshadevi Temple Road

गारगोटी/कडगाव : राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील रक्षादेवी मंदिराजवळील रस्त्यावर चढ असतानाही न्यूट्रलमध्ये ठेवलेली चारचाकी गाडी मॅग्नेटिक पॉईंट असल्यामुळे पुढे सरकते, असा दावा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या घटनेने जिल्हाभरात कुतूहल निर्माण झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष वैज्ञानिक तपासणी करून हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून संबंधित ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा कोणताही विलक्षण परिणाम नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राधानगरी तालुक्यातील चौदा वाड्या-वस्त्यांचा समावेश असलेल्या वाकीघोल परिसराकडे जाणारा रस्ता पश्चिम भुदरगडमधील नितवडे-एरंडपे गावातून जातो. या मार्गावरील रक्षादेवी मंदिराजवळील ठिकाणी रस्ता चढाचा असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. त्यामुळे न्यूट्रलमध्ये ठेवलेली चारचाकी गाडी स्वतःहून पुढे सरकत असल्याचे अनेकांनी सांगितले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने हा परिसर चर्चेचा विषय ठरला होता.

 Bhudargad Rakshadevi Temple Road
Kolhapur News: बाप रे! गाईने दिला चक्क तीन सुदृढ वासरांना जन्म; पाहण्यासाठी गोठ्यात गावकऱ्यांची झुंबड

या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. हरेश सुळ यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनीही हा प्रकार प्रत्यक्षात दृश्यमानतेमुळे निर्माण होणारा भास (ऑप्टिकल इल्यूजन) असू शकतो, असे प्राथमिक निरीक्षण नोंदविले होते.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर, शाखा अभियंता संतोष पाटील व सागर कुंभार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या उपस्थितीत चार वेळा लेव्हल मशीनद्वारे मोजमाप केले. या तपासणीत संबंधित ठिकाणी प्रत्यक्षात रस्त्याला उतार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चारचाकी गाडी पुढे सरकण्यामागे कोणतेही रहस्यमय गुरुत्वाकर्षण किंवा अद्भुत शक्ती नसून, तो केवळ रस्त्याच्या भौगोलिक रचनेमुळे आणि दृश्यमानतेच्या भ्रमामुळे निर्माण होणारा परिणाम असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.

 Bhudargad Rakshadevi Temple Road
Kolhapur news: कळे-गगनबावडा वाहतूक ठप्प; परखंदळे-मेंगाणेवाडीजवळ झाड कोसळले

रक्षादेवी मंदिराजवळील रस्ता मॅग्नेटिक पॉईंट नसून तो केवळ दृश्यभ्रम (ऑप्टिकल इल्यूजन) आहे. लेव्हल तपासणीत संबंधित ठिकाणी प्रत्यक्षात सौम्य उतार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यूट्रलमधील वाहन गुरुत्वाकर्षणामुळे पुढे सरकते. आजूबाजूच्या डोंगररांगा, झाडे

परिसराची भौगोलिक रचना आणि क्षितिज न दिसल्याने रस्ता चढावा असल्याचा भास होतो. त्यामुळे येथे कोणताही चुंबकीय किंवा विलक्षण गुरुत्वाकर्षणाचा परिणाम नसल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

– महेश कांजर, (उप-अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भुदरगड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news