Kolhapur Nipani Ganja smuggling | कोल्हापुरातून गांजाची तस्करी, निपाणीतील दोघावर कारवाई

दुचाकीसह ५५ हजाराचा गांजा जप्त पुरवठादार फरार ; शहर पोलिसांची कारवाई
Ganja
Ganja
Published on
Updated on

राहुल सावंत

निपाणी : कोल्हापूर येथून विक्रीसाठी गांजाची तस्करी करणाऱ्या निपाणीतील दोघांवर कोल्हापूर वेस भुयारी मार्गाजवळ शहर पोलिसांनी कारवाई केली. यावेशी २३ हजार रुपये किंमतीचा गांजा व दुचाकी असा एकुण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

राहुल महांतेश सावंत (वय-२१ रा. आश्रमनगर निपाणी), जाफरसादिक नदीम बशीर पठाण (वय-२१ रा. तहसीलदार प्लॉट, निपाणी) अशी कारवाई केलेल्या दोघाची नावे आहेत. दरम्यान गांजा पुरवठा करणारा कोल्हापुर येथील सलीम (वय ३५) हा संशयित फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध चालविला आहे.

Ganja
Sangli Crime : जिल्ह्यात ‘गांजा’ची शेती, तस्करी जोमात

निपाणी कोल्हापूर रोड भुयारी मार्गाजवळ दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सीबीआय बी.एस.तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पुजारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षिका एस.एस. नरसाप्पानावर, हवालदार संजय काडगौडर, उमेश माळगे, आर एस, ढंग, यासीन कलावंत, प्रभू सिद्धांतगीमठ यांनी राहुल सावंत व जाफर पठाण या दोघांना ताब्यात घेतले.

Ganja
Udgir Ganja Seized | उदगीरमध्ये मोठी कारवाई: ७.४२ लाखांचा गांजा जप्त, १९ वर्षीय तरुण अटकेत

यावेळी दोघांकडे ४०० ग्रॅम गांजा मिळून आला. यावेळी दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपण कोल्हापुर येथील सलीम यांच्याकडून विक्रीसाठी गांजा खरेदी केल्याचे सांगितले.त्यानुसार दोघांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये पुन्हा दाखल करून विक्रेता सलीम याचा शोध चालवला असल्याची माहिती उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news