Kolhapur news | आमरोळी येथील एकाचा मृतदेह गणुचीवाडी जवळील बंधाऱ्यात आढळला

बुधवार १३ मेला ते घरातून बाहेर पडले असून तेव्हापासून बेपत्ता होते
Kolhapur news | आमरोळी येथील एकाचा मृतदेह गणुचीवाडी जवळील बंधाऱ्यात आढळला
Published on
Updated on

अडकूर : आमरोळी (ता. चंदगड) येथील एकाचा मृतदेह गणुचीवाडी येथील घटप्रभा नदीवर असलेल्या बंधाऱ्यात आढळला. याबाबत अधिक माहिती अशी की, बाबू धोंडीबा यादव ( वय ५२, रा. आमरोळी, ता. चंदगड) हे बुधवारी (दि. १३) घरातून बाहेर पडले, ते बेपत्ता झाले होते.

Kolhapur news | आमरोळी येथील एकाचा मृतदेह गणुचीवाडी जवळील बंधाऱ्यात आढळला
Goa drowned student found | बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

दरम्यान रविवारी सकाळी ९ वाजता अडकूर ते गणुचीवाडी मार्गावरील घटप्रभा नदीच्या पात्रात कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यात मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळला. या घटनेची फिर्याद त्यांचा चिरंजीव अजय बाबू यादव (वय २०) यांनी चंदगड पोलीसात दिली.

Kolhapur news | आमरोळी येथील एकाचा मृतदेह गणुचीवाडी जवळील बंधाऱ्यात आढळला
Farmer drowns in Girna River: गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी अंत!

सदर मृतदेहाचे चंदगड येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलिस हवालदार अजित कांबळे करत आहेत. बाबू यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, जावई, दोन मुलगे, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news