Goa drowned student found | बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
इम्तियाज हुसेन
इम्तियाज हुसेन
Published on
Updated on

फोंडा : ओकांब-धारबांदोडा येथील दूध-सागर नदीच्या पात्रात रविवारी सायंकाळी बुडालेल्या आयआयटी गोवा (फर्मागुडी) मधील इम्तियाज हुसेन (वय २१, लडाख) या विद्यार्थ्याचा मृतदेह सोमवारी दुपारी शोध पथकाला सापडला आहे. सुमारे २४ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर बचाव पथकाने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला.

इम्तियाज हुसेन
Goa youth Sanatan values | युवा पिढी सनातनी व्हावी : मुख्यमंत्री

रविवारी दुपारी आयआयटीच्या आठ विद्यार्थ्यांचा गट ओकांब येथे गेला होता. नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले असताना, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने इम्तियाज अचानक प्रवाहात ओढला गेला. सोबतीला असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर फोंडा पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. रविवारी रात्री अंधार पडेपर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली होती; परंतु मृतदेह सापडला नव्हता.

इम्तियाज हुसेन
Nagpur Wildlife Census | नागपूर जिल्ह्यातील पेंचमध्ये ११ वाघ, १६ बिबट्यांची नोंद

सोमवारी सकाळी धारबांदोडाचे उपजिल्हाधिकारी अमितेश शिरवोईकर आणि मामलेदार मनोज कोरगावकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्याचा आढावा घेतला. दुपारी नदीच्या पात्रातून इम्तियाजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news