kolhapur massage center prostitution
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या स्पावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. File Photo

कोल्हापुरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

मसाज सेंटरच्या आड कोल्हापुरात वेश्या व्यवसाय; एकास अटक
Published on

कोल्हापूर : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या शाहूपुरी तिसर्‍या गल्ली येथील वेलनेस स्पावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. या सेंटरचा चालक नागेश रमेश बेळन्नावर (वय 32, मूळ रा. हिप्पगिरी, जि. विजापूर) याला अटक केली. जागा मालक दत्तात्रय गणपती शिंदे (रा. शाहूपुरी, 3 री गल्ली) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

kolhapur massage center prostitution
विधानसभेला जागा लढवायच्या की पाडायच्या; लवकरच ठरवणार

स्पा चालक बेळन्नावर याला अटक

शाहूपुरी येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सोमवारी रात्री छापा टाकून झडती घेतली असता, दोन पीडित महिला आढळल्या. स्पा चालक बेळन्नावर पीडित महिलांचा गैरफायदा घेऊन वेश्या अड्डा चालवत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पीडित महिलांची सुटका करून स्पा चालक बेळन्नावर याला अटक केली. त्याचावर यापूर्वीही अवैध मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई झाली आहे.

kolhapur massage center prostitution
'Rashid Khan'चा T-20मध्ये मोठा पराक्रम! ठरला पहिला गोलंदाज

चोरावर मोर

एकीकडे शाहूपुरीसारख्या वर्दळीच्या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाची पाठराखण करण्याचे कारण सांगून स्पा सेंटर चालकाकडूनच एक माजी नगरसेवक खंडणी उकळत होता, अशी माहिती समोर आली आहे. ‘चोरावर मोर’ होणार्‍या या माजी नगरसेवकावर कारवाई होणार का, अशी चर्चा यावेळी सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news