कोल्हापूर : मुदाळतिट्टा येथे मराठा आरक्षणप्रश्नी रास्ता रोको

मुदाळतिट्टा रास्ता रोको
मुदाळतिट्टा रास्ता रोको

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज (दि. २८) मुदाळतिट्टा (ता.कागल) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे एक तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा दिला.

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार शिरसागर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अक्षय सरनोबत, हेमंत पाटील, आनंदराव पाटील, प्रा. बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. छगन भुजबळ यांनी मराठा समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

गारगोटीचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मराठा समाज आंदोलनकर्त्यांनी घेतली विद्यार्थ्यांची काळजी

बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रास्ता रोको आंदोलन ११ नंतर करण्यात आले. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी आपापल्या केंद्रावर नियोजित वेळेत पोहोचले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news