कोल्हापूर, सांगलीतील पूर रोखण्यासाठी 3200 कोटींचा प्रकल्प

कोल्हापूर, सांगलीतील पूर रोखण्यासाठी 3200 कोटींचा प्रकल्प

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पूर आणि नैसर्गिक आपत्तींमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने तीन हजार 200 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले. तसेच कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र आणि कोल्हापूर, मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
या अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत विविध स्मारकांसह पायाभूत विकास प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

विविध स्मारके, पायाभूत विकासांच्या प्रकल्प पुढीलप्रमाणे

पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी.
पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरू.
फलटण-पंढरपूर या नवीन रेल्वे मार्गाकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग.
कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेवटच्या भागातील 23 गावांसाठी बंधारे बांधणार.
बारामती, कोल्हापूर आणि मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी
100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय.
नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था.
शिवसागर – कोयना जिल्हा सातारा, गोसीखुर्द जलाशय, जिल्हा भंडारा तसेच वाघुर जलाशय, जिल्हा जळगाव येथे नावीन्यपूर्ण जल पर्यटन प्रकल्प.
लोणावळा, जिल्हा पुणे येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प – 333 कोटी 56 लाख किंमत.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, ता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील स्मारक – 270 कोटी रुपये किमतीचा आराखडा, काम सरू.
एकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना.
प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवा महाल यांच्या स्मारकासाठी जागा.
संगमवाडी, पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक
हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकासासाठी 102 कोटी 48 लाख रुपयांचा आराखडा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news