Kolhapur News | हेरवाडमध्ये ग्रामस्थांचा संताप; आरोपी शिक्षकाला अटक करण्यासाठी मूक मोर्चा

गावसभा गाजली; संस्थेच्या सचिवांसह प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार, मदत करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी
Kurundwad Teacher Arrest Demand
Kurundwad Herwad Teacher Arrest DemandPudahri
Published on
Updated on

Kurundwad Herwad Teacher Arrest Demand

कुरुंदवाड : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षक अजित दिवटे याला अद्याप अटक न झाल्याने आणि संबंधित शिक्षकावर संस्थेने निलंबनाची कारवाई न केल्याच्या निषेधार्थ सोमवारी ( दि.२७) ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सकाळी गावसभा घेऊन प्रशासन आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर सायंकाळी गावातून प्रमुख मार्गावर शांततेत मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Kurundwad Teacher Arrest Demand
Kolhapur Teacher Suspended | विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षक अजित दिवटेला निलंबित करण्याचे आदेश

सकाळी ११ वाजता गावातील सभागृहात कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, संस्थाचालक आणि शाळा प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन तसेच संस्थेचे सचिव अजित पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

ग्रामस्थांनी, "आरोपी शिक्षकाला अद्याप अटक का करण्यात आली नाही? तसेच संस्थेने अजित दिवटे या शिक्षकाला निलंबित अथवा बडतर्फ का केले नाही?" असा थेट जाब विचारला. चर्चेदरम्यान संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांच्या भूमिकेमध्ये विसंगती आढळून आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Kurundwad Teacher Arrest Demand
kolhapur | अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

यावेळी अनेक ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पळून जाण्यास संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक तसेच काही शिक्षकांनी मदत केल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच पीडित विद्यार्थिनीच्या पालकांवर प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते बंडू पाटील यांनी आरोपी शिक्षकाला मदत केल्याचा संशय असलेल्या शिक्षकांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.

Kurundwad Teacher Arrest Demand
kolhapur | राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामी विचार जेन-झी पिढीमध्ये रुजविण्याचा निर्धार

बैठकीत सुरगोंड पाटील, पिंटू पाटील, बंडू पाटील, सचिन पाटील, धनंजय सौदे, संजय पुजारी, बंडू मोदी, राहुल इटाज, महेश कांबळे, भरत पवार, छाया सूर्यवंशी, चंद्रकला पाटील, स्नेहा देसाई, छाया गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आपली मते मांडली. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news