

Kurundwad Student Molestation Case Teacher Suspended
कुरुंदवाड : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सहाय्यक शिक्षक अजित भूपाल दिवटे याला तत्काळ सेवेतून निलंबित करून शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षण संस्थेला दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नि चौकशी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांची सुरक्षा, हित व शाळेतील शैक्षणिक वातावरणाची शुचिता लक्षात घेता ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे शिक्षण विभागाने नमूद करत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ नुसार दिवटे यांना तत्काळ निलंबित करून शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित शिक्षकाचे अध्यापन व इतर कामकाज इतर शिक्षकांकडे सोपविण्याचे निर्देशही संस्थेला देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षण संस्था आता काय कारवाई करणार याकडे पीडीत विद्यार्थीनीच्या गावच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे