कोल्हापूर : कुरुंदवाड-बस्तवाड रस्त्यावरील पाईपलाईनला गळती

कुरुंदवाड शहराला कृष्णा पाणी योजनेच्या गळतीचा अभिशाप
Krishna scheme pipeline leak
कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनला गळती
Published on
Updated on

कुरुंदवाड : इचलकरंजी  शहराला वरदान ठरलेल्या कृष्णा नळ पाणी योजना कुरुंदवाड शहरासाठी अभिशाप बनत चालली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी उपसापासून ते योजनेच्या ठिकाणापर्यंत ठिकठिकाणच्या गावात वारंवार पाईपलाईनला मोठी गळती लागते आणि लाखो लिटर पाणी वाया जाते. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर बस्तवाड रस्त्यावर मोठी गळती लागली आहे.

Krishna scheme pipeline leak
कोल्हापूर : महामार्ग रोखल्याप्रकरणी काँग्रेसच्या बावीस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कुरुंदवाड-इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या गळतीचा प्रश्न जटील झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी याच रस्त्यावर मोठी गळती लागली होती. तर शिरढोण पुलाजवळ गळती लागून सागर सावगवे यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. इचलकरंजी पर्यंतच्या गावातील रस्त्याचे आणि शेतीचे गळतीमुळे नुकसान झाले आहे. बस्तवाड रस्त्यावर बुधवारी (दि.७) महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दुपारी ४ वाजता अचानक मोठी गळती लागली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

Krishna scheme pipeline leak
कोल्हापूर : वाहनांना 'टोल'मध्ये २५ टक्के सवलत मंजुरीनंतरच मिळणार

पाईपलाईनच्या गळतीबद्दल वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही संबधित अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे या गळतीच्या यातना कुरुंदवाड, शिरढोण टाकवडेच्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना भोगाव्या लागत आहेत.

Krishna scheme pipeline leak
कोल्हापूर : चरण येथे तुटलेल्या विद्युत वाहिकेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू

शिरढोण-टाकवडे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर केवळ तक्रार आहे, म्हणून रस्ता उखरून ठेवायचे आणि लिकेज सापडले नाही. म्हणून पुन्हा ते खड्डे मुजवायचे, हा प्रकार सुरू असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. पाणी उपसापासून ते योजनेच्या ठिकाणापर्यंत एकदा हा गळतीचा विषय तपासून बघा अन्याथा या तिन्ही गावातून या योजनेला तीव्र विरोध करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news