Kolhapur Crime | दानोळीत गोळ्या झाडून तरुणाचा खून; दुचाकीवरील दोन अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार

चांदोली वसाहतीजवळ घटना; उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू
Jaysingpur Youth Shot Dead
महेश दळवी Pudhari
Published on: 
Updated on: 

Jaysingpur Youth Shot Dead

दानोळी : दानोळी येथे गोळीबार करून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१९) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. महेश बजरंग दळवी (वय ४२) असे मृत तरुणाचे नाव आहे. दानोळी-जयसिंगपूर मार्गावरील चांदोली वसाहत परिसरात ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी महेश यांच्यावर तीन गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

महेश दळवी यांचे चांदोली वसाहत येथे घर आहे. रविवारी सकाळी ते दानोळी येथून आपल्या घराकडे दुचाकीवरून जात होते. चांदोली वसाहतीच्या पहिल्या थांब्याजवळ दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. घराजवळील पहिल्या ओढ्याच्या परिसरात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली.

Jaysingpur Youth Shot Dead
Kolhapur Crime : जोडप्याच्या जाचाला कंटाळून बुवाचे वठार येथे महिलेने संपविले जीवन

गोळीबार झाल्यानंतर महेश यांनी दुचाकी सोडून शेजारी राहणाऱ्या गुरव यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, चेहऱ्यावर मास्क बांधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत आणखी दोन गोळ्या झाडल्या. जीव वाचवण्यासाठी महेश यांनी गुरव यांच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश केला. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरव यांच्या घरातील मागील खोलीत रक्ताचा सडा पडला होता.

घटनेची माहिती मिळताच महेश यांचे भाऊ विजय दळवी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत. हल्ल्यामागील कारण आणि हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news