कोल्हापूर : अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ‘वैष्णवी’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश | SSC Result Maharashtra 2023

कोल्हापूर : अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ‘वैष्णवी’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश | SSC Result Maharashtra 2023
Published on
Updated on

विशाळगड , पुढारी वृत्तसेवा : परिस्थिती कितीही बिकट असली, तरीही काही माणसं जिद्द सोडत नाही. नियती अग्निपरीक्षा घेत असते. मात्र त्यातूनही काही जण अगदी ताऊन सुलाखून निघतात. संकटांना थेट भिडणारी आणि आभाळ कोसळले तरी त्यावर पाय रोऊन उभे राहणारी माणसे इतरांसाठी आदर्श ठरतात. परीक्षा ही बळ देते फक्त एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी असली पाहिजे. मग जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते. हेच पुन्हा एकदा वैष्णवी सुधाकर वेल्हाळ हिच्या यशावरून समोर येतंय. तिने अत्यंत कठीण परिस्थितीत मिळवलेले यश हे खरच आदर्शवत आहे, असे उद्गार शिक्षक एस टी पाटील यांनी काढले.

गजापूर येथील आदर्श हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी सुधाकर वेल्हाळ हिने दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक आदर्श घालून दिला. आईचे छत्र लहानपणीच हरविले. वडील सुधाकर वेल्हाळ यांना एक मुलगा वैभव व मुलगी वैष्णवी. सुधाकर हे विशाळगड पायथ्याशी हंगामात चालेल तो व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे वैष्णवीची घरची परिस्थिती तशी बेताचीच. मात्र अशाही परिस्थितीत वैष्णवी नेहमीच हसतमुख आणि इतरांना धीर देणारी मुलगी म्हणून परिचित. त्यामुळे ती शिक्षकांसह सर्वांचीच लाडकी. आईच्या निधनानंतर तिच्या कुटुंबाला साथ दिली ती तिच्या काका-काकींनी.

आईच्या निधनामुळे वैष्णवीवरच घरची सर्वच जबाबदारी पडली. वडिलांचे जेवण, नाष्टा, कपडे धुणे व इतर कामे करत तिने जिद्द, चिकाटी,  आत्मविश्वास आणि खडतर परिश्रम करत दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला लहानपणापासून संघर्षमय जीवन जगावे लागले. वैष्णवीचा वर्गात नेहमीच प्रथम क्रमांक असे. आदर्श विद्यार्थीनी म्हणून तिचा गौरव करण्यात आला आहे.तिचे विशेष म्हणजे शाळा सुटली तरी घरी न जाता सर्व शिक्षक गेल्यावरच ती घरी जायची. तोपर्यंत ती शिक्षकांच्या सहवासात राहायची, शिक्षकांचे विचार, प्रेरणा हे तिच्या यशामागाचे गमक असल्याचे ती आवर्जून सांगते.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news