Gokul News | शनिवारी होणार सत्तासंघर्षाचे चित्र स्पष्ट

gokul milk union power struggle decision update- शनिवारी होणार सत्तासंघर्षाचे चित्र स्पष्ट
Gokul News
Gokul News
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

'गोकुळ'च्या सत्ता संघर्षाचे चित्र शनिवारी (दि. ७) स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शासन नियुक्त चार संचालकांच्या नावांचा आदेश शनिवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे येण्याची शक्यता आहे. बुधवारी ५०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकारी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. निर्णयाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठीची आवश्यक शासकीय प्रक्रिया पुढील दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 'गोकुळ'मध्ये चार शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे येणार आहे.

Gokul News
Farmers Relief : कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत

मंत्रिमंडळातील बैठकीत शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय झाला. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसल्याने मंत्री मंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपालांच्या स्वाक्षरीने याबाबतचा अध्यादेश निघेल. हा अध्यादेश राज्य शासन नियुक्त संचालकांच्या नावांचा आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे येण्याची शक्यता आहे.

Gokul News
Brand Kolhapur Award | ‘ब्रँड कोल्हापूर’चा जीवन गौरव डॉ. मोरे, डॉ. भुताडिया यांना जाहीर

दोन दिवसांत शासकीय प्रक्रिया होणार पूर्ण

सहकारी निवडणूक प्राधिकरणकडे जाईल. त्यांच्याकडून मुंबईमधील सह प्रज्ञा तायडे यांच्याकडे अध्यादेश आल्यानंतर त्यांच्याकडून 'गोकुळ' वर नियुक्त केलेल्या चार शासन नियुक्त संचालकांची नावे असणारा आदेश विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांच्या पुणे कार्यालयात येईल. विभागीय उपनिबंधक मिसाळ हा आदेश 'गोकुळ'च्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पाठवतील. यासंदर्भातील न्यायालयीनबाब तपासून निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित शासन नियुक्त संचालकांना सभेची नोटीस काढण्याबाबत काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

'समविचारी' कर्नाटकात, 'महायुती'चे संचालक मुंबईत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

'गोकुळ' अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर 'गोकुळ'चे नूतन संचालक पुन्हा सहलीवर गेले आहेत. समविचारीचे १३ संचालक कर्नाटकमध्ये, तर महायुतीचे सर्व १२ संचालक अलिबाग मुंबई येथे थांबून असणार आहेत. १० नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्ष निवड सभे दिवशीच हे संचालक कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत.

बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 'गोकुळ'वर पाच शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती होणार आहे. यापैकी चौघांना मतदानाचा अधिकार असणार आहे. या निर्णयामुळे 'गोकुळ'च्या सत्ता संघर्षाला नवे वळण मिळाल्याने दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी संचालकांना पुन्हा सहलीवर पाठविले आहे. बुधवारी सकाळी महायुतीचे संचालक विमानाने मुंबईला रवाना झाले. तर समविचारीचे संचालक कर्नाटकडे मार्गस्थ झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.