Farmers Relief : कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत

८ तालुक्‍यांतील शेतकर्‍यांच्‍या खात्‍यात ५ हजार रुपये जमा होणार
 Farmer Financial Aid
Farmer Financial AidFile photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्‍यांतील शेतकर्‍यांच्‍या बँक खात्‍यात दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये अग्रीम जमा करण्‍याच्‍या घेतलेल्‍या निर्णयाचा कोल्‍हापूर जिल्‍ह्याच्‍या आठ तालुक्यांतील सुमारे १.५० लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

राज्य सरकारने दुष्‍काळग्रस्‍त म्‍हणून जाहीर केलेल्‍या ३०४ तालुक्यांत कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील ८ तालुक्‍यांचा समावेश आहे. जिल्‍हा प्रशासन व कृषी विभागाने पंचनामे करून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा अचूक अंदाज घेत त्‍याचा संयुक्त अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे.

महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पंचनाम्‍याच्‍या अहवालानुसार सुमारे १ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम मदत दिली जाईल. ही रक्कम दिवाळीपूर्वी थेट डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे संकटग्रस्‍त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news