

पाटाकडील तालीम मंडळाची गणेशमूर्ती मिरजकर तिकटी येथे दाखल होताच गणेशभक्तांनी जल्लोष केला. संगीताच्या तालावर कार्यकर्ते थिरकले. मंडळाचे पारंपरिक पिवळे-निळे रंगाचे झेंडे फडकावत कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केला.
लेटेस्ट तरूण मंडळाने यंदाच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत गोवा मुक्ती संग्रामाचा सजीव देखावा करून आपलं वेगळेपण जपलं आहे.
कोल्हापूर गणेश मूर्ती विसर्जन मिवरणुकीत कोल्हापूरच्या प्रसिद्ध दूध कट्ट्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यंदा कोल्हापूर गणेश मुर्ती विसर्जनावेळी जवळपास ८०० ते १००० गणेश मुर्ती विसर्जित होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने यंदाची गणेश मुर्ती मिरवणूक चांगलीच हालती ठेवली आहे. अनेक मोठी मंडळे ही मुख्य मिरवणूक मार्गावर दाखल झाली आहे. आता जसजशी रात्र जवळ येईल तसतसे हा वेग कामय राहतो का ते पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे.
इराणी खणीत गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यास सुरूवात, अनेक तराफे अन् क्रेन्सची सोय
कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम तालीम मंडळाचा गणपती प्रसिद्ध महाद्वार रोडवर दाखल झाला असून ढोल ताशांच्या गजरात प्रस्थान सुरू
कोल्हापुरात मोठी दुर्घटना, करवीरचा राजाची मूर्ती रस्त्यातच कोसळली. यात काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत अशी माहिती मिळत आहे.
शाहू महाराजांच्या हस्ते प्रथम मानाच्या गणपतीची आरती, पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तुकाराम तालीम मंडळाच्या गणपतीच्या आरतीवेळी आमदार राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील देखील उपस्थित होते.
वाय पी पोवार नगरमधील प्रसिद्ध बॅलेन्सिंग मूर्ती देखील विसर्जन मिवरणुकीसाठी मंडळाच्या मांडवातून बाहेर पडली आहे. मूर्ती बॅलेन्सिंग असल्यानं अत्यंत सावध पद्धतीनं हळू हळू पुढे नेण्यात येत आहे.
मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, गंगावेश चौक या मार्गावर सात ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविली आहे. मार्गावर अतिरिक्त विद्युत व्यवस्थेसाठी हेरिटेज खांबांवर २०० वॅट क्षमतेचे ३० फ्लड लाईट बसविले आहेत.
कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती तुकाराम तालीम मंडळाचा गणपती विसरजन मिवरणुकीत बाहेर पडला आहे.
कोल्हापूर गणेश मुर्ती विसर्जन मिरवणूक आता रंगात येत असून प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी केल्याने यंदाची विसर्जन मिरवणूक दिवसा तरी चांगल्या गतीने पुढे सरकत आहे. प्रशासन मिरवणुकीला गालबोट लागू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. मात्र वाय. पी. पोवार नगर मित्रमंडळाची बॅलेंसिंग गणेश मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असताना कोसळली.
दुसरीकडे मुख्य मिरवणूक मार्गावर अनेक आकर्षक देखावे देखील सादर केले जात आहेत. विसर्जनासाठी इराणी खणीत अनेक तराफे आणि क्रेन्सची सोय केली आहे. सध्या तरी विसर्जन मिरवणुकीचा वेग चांगला आहे. आता हा वेग रात्रीच्यावेळी कसा असते हो पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.