Gadhinglaj Drought | अखेर गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश; तीन आठवड्यांच्या लढ्याला यश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय
 Maharashtra Drought |
Maharashtra Drought | कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील ४३ तालुकेही दुष्काळी यादीत Kolhapur drought,
Published on: 
Updated on: 

Gadhinglaj Taluka Farmers Relief

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सर्वपक्षीय आंदोलनाला अखेर यश आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तालुक्यात कमी पाऊस, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, शेजारील आजरा आणि चंदगड तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करून गडहिंग्लजला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या निर्णयाच्या निषेधार्थ २९ ऑक्टोबरपासून दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

 Maharashtra Drought |
kolhapur Crime News | मैलखड्डा तोडफोड; सहा जणांना अटक

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी चुली मांडून भाकरी भाजल्या, बैलजोड्या आणल्या, रॅली काढली. विद्यार्थ्यांनी फेरी काढून सहभाग नोंदविला. आठवडा बाजारात भीक मागो आंदोलन, मेंढपाळांचा मेंढ्यांसह मोर्चा आणि दंडवत यात्रा अशा विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या लढ्यात मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजी पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.

१७ नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नव्याने सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आल्याने आंदोलन चिघळले. आंदोलकांनी टायर पेटवून रास्ता रोको केला. त्यानंतर पोलीस ठाण्यातही ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 Maharashtra Drought |
Kolhapur News : न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाजावर परिणाम

दरम्यान, ४० गावांच्या सर्वेक्षणात ४ हजार ४३८ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १ हजार ४९८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. अखेर शासनाच्या घोषणेमुळे तीन आठवड्यांच्या संघर्षाला यश आले आहे. आता दुष्काळी सवलती आणि मदतीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.