FDA Raid Kolhapur | 'एफडीए'च्या धाडसत्राने शिरोळ तालुक्यात खळबळ; अनेक लघुउद्योग तात्पुरते बंद

बेकरी, नमकीन आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण
Shirol Industry Shutdown
Shirol Industry Shutdown AI Photo
Published on
Updated on

Shirol Industry Shutdown

बिरू व्हसपटे

शिरढोण : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून सुरू असलेल्या धाडसत्रामुळे शिरोळ तालुक्यातील बेकरी, नमकीन आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. अकिवाट, अब्दुललाट तसेच यड्राव येथील शालिमार कंपनीवर नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर अनेक लघुउद्योगांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपले उद्योग तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एफडीएकडून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक तपासण्या सुरू करण्यात आल्याने उत्पादन क्षेत्रात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः बेकरी आणि नमकीन उत्पादकांमध्ये कारवाईची धास्ती वाढल्याचे चित्र दिसत आहे. अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या उद्योजकांनाही तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांनी उत्पादन थांबविणेच पसंत केले आहे.

Shirol Industry Shutdown
Kolhapur news | अब्दुल लाट ग्रामपंचायतीत अंगणवाडी रंगकामाच्या निधीचा अपहार? २०२३ चे जुने फोटो वापरून २०२५ मध्ये काढले बिल

काही व्यावसायिकांच्या मते, नियमांचे पालन करूनही अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागू नये, या भीतीपोटी उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील लघुउद्योग क्षेत्रात संभ्रम आणि चिंता वाढली आहे.

दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. तालुक्यातील विविध उत्पादन युनिट्सची तपासणी करून परवाने, उत्पादन प्रक्रिया, स्वच्छता आणि दर्जासंदर्भातील निकषांची पडताळणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रात सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले असून एफडीएच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shirol Industry Shutdown
Kolhapur News : कोल्हापुरातील तरुणाने कागलला गळफास घेऊन संपविले जीवन

लघुउद्योगांमध्ये संभ्रमाचे वातावरण

यड्राव येथील शालिमार कंपनीवरील कारवाईनंतर शिरोळ तालुक्यातील बेकरी, नमकीन व दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक धाडी आणि गुप्त तपासण्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून उद्योग तात्पुरते बंद ठेवले आहेत. नियमांचे पालन करणाऱ्या उद्योजकांनाही कारवाईची भीती वाटत असल्याने उद्योग क्षेत्रातून प्रशासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन आणि पारदर्शक तपासणी प्रक्रियेची मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news