

कोल्हापूर : येथील गजानन महाराज नगरमधील उच्चशिक्षित तरुणाने बुधवारी (दि. १०) सकाळी कागल एमआयडीसीतील लक्ष्मीटेकडी परिसरात झाडास गळफास घेऊन जीवन संपविले. विशाल हरी शेळके (वय २९) असे त्याचे नाव आहे.
त्याने जीवन का संपविले? याचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे. मृतदेहा शेजारी असणारी दुचाकी व खिशातील मोबाईलवरून मृतदेह विशाल शेळके याचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी विशालच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती दिली.