Kolhapur crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाची दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई, ५ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त; १५ जणांना अटक

जिल्ह्यातील हातभट्टीचे दारू अड्डे केले जमिनदोस्त
Kolhapur crime
Kolhapur crime
Published on
Updated on

कोल्हापूर : पुणे येथील दुर्घटनेनंतर जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात धडक कारवाई केली. २२ गुन्हे दाखल करुन १५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Kolhapur crime
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे येथे विषारी दारु प्राशन केल्यामुळे १५ जणांचा बळी गेला. यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाने सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात छापेमारी सुरू ठेवली.

Kolhapur crime
Kolhapur news | उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर ! यर्तनहट्टी येथे गावठी दारूभट्टी उध्वस्त, तिघांवर गुन्हा दाखल

दानोळी (शिरोळ), माणगाववाडी, (ता. हातकणंगले), जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर शहर, गडहिंग्लज येथील १५ ठिकाणांवर रविवारी छापे टाकण्यात आले. यामध्ये हातभट्टीचे दारू अड्डे जमिनदोस्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ११ पथकांनी ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news