दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड सह टाकळीवाडी, दानवाड, घोसरवाड आधी परिसर पाण्याच्या बाबतीत तिहेरी संकटात सापडले आहे. एरवी पाण्याच्या बाबतीत समृद्ध समजला जाणारा या भागाला यंदा वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी अद्याप या परिसरात एकही जोरदार वळीव पाऊस पडला नाही. शिवाय दूधगंगा नदी पात्र ही वारंवार कोरडे पडत आहे. त्यामुळे पाण्याचे एक मात्र स्त्रोत राहिलेले बोरवेल हे ही अटू लागले आहेत. त्यामुळे या परिसरात पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पावसाला सुरुवात व्हावी अशी प्रार्थना येथील ग्रामस्थ, शेतकरी वर्ग करीत आहेत.