Kolhapur Crime : कोल्हापुरात भरदिवसा थरार! रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरेवर गोळीबार; नाना पाटील चौक परिसरात तणाव

टोळीयुद्ध की जुना वाद? सूरज साखरेवरील गोळीबाराचे गूढ वाढले
Kolhapur Crime : कोल्हापुरात भरदिवसा थरार! रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरेवर गोळीबार; नाना पाटील चौक परिसरात तणाव
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गुरुवारी भरदिवसा गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील गजबजलेल्या नाना पाटील चौक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गोळीबार केला. या गोळीबारात सूरज साखरे नावाचा गुन्हेगार गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सूरज साखरे हा नाना पाटील चौक परिसरात असताना अचानक आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच धावपळ उडाली. सूरज साखरे याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पूर्ववैमनस्यातून किंवा टोळीयुद्धातून हा हल्ला झाला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Kolhapur Crime : कोल्हापुरात भरदिवसा थरार! रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरेवर गोळीबार; नाना पाटील चौक परिसरात तणाव
Cricket Money Dispute | क्रिकेटच्या पैशावरून घरात घुसून कोयत्याने हल्ला

जखमीवर उपचार सुरू

गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरज साखरेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

परिसरात तणाव, पोलीस घटनास्थळी दाखल

भरचौकात घडलेल्या या प्रकारामुळे नाना पाटील चौक आणि आसपासच्या परिसरात सध्या कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

Kolhapur Crime : कोल्हापुरात भरदिवसा थरार! रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरेवर गोळीबार; नाना पाटील चौक परिसरात तणाव
Kolhapur Crime : टेम्पो घेण्यासाठी केली मालकाच्या घरी चोरी

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. हल्लेखोर कोण होते आणि ते कोणत्या दिशेने फरार झाले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली असून तपास पथके रवाना केली आल्याचे समजते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news